इरिट्रिया
Category:
शहरे आणि गावेइरिट्रिया हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.