No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती

Category:

 

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची, अक्षरानुक्रमे यादी, 3 मे 1963 पासून, म्हणजे माझ्या 30 व्या वाढदिवसापासून, एका डायरीत लिहीण्यास सुरूवात केली. हीच मराठी आडनावकोशाची सुरूवात. ऑगस्ट 1970 पर्यंत 6 हजार, नोव्हेंबर 1972 पर्यंत 8 हजार तर 1973 च्या जून महिन्यापर्यंत जवळजवळ 10 हजार आडनावे जमा झाली होती. सध्या हा आकडा 60 हजारापर्यंत पोचला आहे.

No Picture
लेखसंग्रह

आडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव

Category:

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.

No Picture
लेखसंग्रह

गाढवेंचे झाले तारळेकर

Category:

 

कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावात ‘वाघ’

Category:

 

वाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचं वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला प्राणी आहे याचा हा पुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामं करून घेतली जातात, याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेलं वाघाचं पिल्लू पाळलं तर त्याचं हिंस्रपण कमी होतं.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावं – माअी

Category:

 

काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनाव – शब्दी-महाशब्दी

Category:

 

आडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते. प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनाव – बोंबला

Category:

 

भुसावळजवळील, वरणगाव येथे माझी आत्या राहते. त्या कुटुंबाला, अहिल्याबाआी होळकरांच्या काळापासून अेका मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावे – रामनामे आणि मजली

Category:

 

अेकदा समर्थ रामदासस्वामी त्यांच्या घरी मुक्कामास आले. तेव्हा त्यांनी श्रीरामाची मूर्ती आणि प्रचारमंत्र दिला. नंतर या पावन कुटुंबात, रामनामाचे पाठ आणि रामभजन कित्येक वर्षे नियमित चाललं. परिणामी त्या कुटुंबाचं आडनावच ‘रामनामे’ असं रूढ झालं. अजूनही रामनामे आडनावाचे वंशज आहेत.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनाव – गुळदगड

Category:

 

गुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा कुण्या जाणकार व्यक्तीकडूनच, बर्याच खात्रीपूर्वकरित्या जाणून घेतल्या जाअू शकतात.

No Picture
कथा

नाद

Category:

 

आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.