No Picture
साहित्य - ललित

अवघा रंग एक झाला !

Category:

 

किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो

No Picture
साहित्य - ललित

श्रद्धांजली…. महाराजांना !!

Category:

 

आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !)

३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते आसन्नमरण अवस्थेतल्या त्या श्रीमंत योगीश्वराच्या मनाशी एकरूप होऊन सांगू लागतं.

No Picture
साहित्य - ललित

ही पण “श्रीं” ची च इच्छा !

Category:

 

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.

No Picture
साहित्य - ललित

बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर

Category:

 

मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे.

No Picture
लेखसंग्रह

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

Category:

 

“गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे.

No Picture
लेखसंग्रह

बाबा…तुमच्यासाठी…

Category:

 

‘डॉक्टर, मला माझ्या मुलाकडे परत जायचं नाहीये. इथे तुम्ही जवळ असाल म्हणून या शहरात राहायला आलोय मी’ त्या वयोवृद्ध माणसाच्या मनातली ती खंत दुखावलेल्या अश्रुपूर्ण नजरेतून बाहेर येत होती.. ‘अमेरिकेत असतो माझा मुलगा. फार बिझी असतो तो. तिकडे वैद्यकीय उपचारही अतिशय महाग आहेत. त्याला मदत करायची इच्छा असते, पण नाईलाज असेल त्याचा. त्याला आता काय करणार?’ पोटात भयंकर दुखायला लागल्यामुळे तातडीने ते आणि त्यांची पत्नी भारतात परतले होते. आल्या दिवशीच त्यांच्या हर्निया मध्ये आतड्याला पीळ बसल्याचं निदान झालं. लगेच ऑपरेशन झालं आणि बरे होऊन ते घरी ही गेले. पार्किन्सन च्या त्रासासाठी ते माझ्याकडे येत असतात.

No Picture
लेखसंग्रह

हे राम , नथुराम

Category:

 

या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :

No Picture
लेखसंग्रह

ठाणे म्यूझिक फोरम

Category:

 

तर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे! }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले ! २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळयांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय ! अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर ! या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि ! कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर मंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्‍या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले ! तीन दिवस कान तृप्त झाले ! बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल ? फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल

No Picture
लेखसंग्रह

३६० वर्षांची तळमळ…..

Category:

 

नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो !
आमचा जन्म सुमारे ३६० वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्‍या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे ! त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मते आम्ही कुविख्यात असण्याची शक्यता आहे.पण आम्ही केलेल्या एकमेव चुकीचे आम्ही प्रायश्चित्त पण तितकेच कठोर आई भवानीकडून “याची देही याची डोळा” मागून घेतले आणि त्या परम दयाळू मातेने ते दान आंम्हांस दिलेही !

सांगण्याचा मुद्दा असा की, या सगळ्या गोष्टींमुळे माझा जन्म आपणास लक्षात असण्याची सुतराम शक्यता नाही , पण आमचे मरण मात्र आपल्याला जरूर लक्षात असेल – आधी आमची उंटावरून बसून तख्ता कुलाह लावून विदुषकाच्या पेहेरावातील काढलेली धिंड, मग आमचे हाल हाल करताना आधी डोळे, मग जीभ , मग सार्‍या अंगाची सालडी , मग हात, मग पाय आणि सर्वांत शेवटी आमचे मस्तक धडावेगळे करून आमचे एक एक अवयव वढू बद्रूक येथे गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर टाकणार्‍या औरंगझेबास आणि शरीराच्या तुकड्या तुकड्यांनी तुमच्या राज्यांतील नदीकिनारी पडलेल्या स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींना तुम्ही कदाचित् ओळखत असाल ,नाही? काय आहे , की गेली ३२८ वर्षे आमचा आत्मा तळमळतो आहे आणि आजचे आमचे वंशज मराठा जे भोगत आहेत ,