No Picture
साहित्य - ललित

शास्त्रीबुवा

Category:

 

झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.

हे कांही कुणाला माहीत नव्हते. वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत. शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.” घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.