No Picture
साहित्य - ललित

आजपासून दीपावली

Category:

 

दीपावली म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणारे एक प्रकाशपर्व ! आनंदाचा मंगलमय अमृतकलश घेऊन येणारे जीवनातील अनमोल क्षण !नवी स्वप्ने , नव्या आकांक्षा यांना मिळणारी सुवर्ण झळाळी म्हणजे हा दीपोत्सव ! आपल्या जगण्याला नवीन भान देणारी , आपल्या तनमनात वज्रशक्ती पेरणारी , नवसृजनाला आवाहन करणारी तेजाची आरती म्हणजे हा दिव्यांचा सण !