Year: 2022
रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)
Category:
साहित्य - ललिततुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला.
एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)
Category:
कथा साहित्य - ललितएका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)
Category:
साहित्य - ललितआईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला.
एक परीस स्पर्श (भाग – ४०)
Category:
कथा साहित्य - ललितसध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ?
एक परीस स्पर्श (भाग – ३९)
Category:
कथा साहित्य - ललितदोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे नव्हे तर दिसण्याचेही विजयचे एक तंत्र आहे..
१९५०च्या आधीची अंधेरी (आठवणींची मिसळ – भाग ७)
Category:
साहित्य - ललित१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं.
एक परीस स्पर्श (भाग – ३८)
Category:
कथा साहित्य - ललितविजयच्या बहिणीने तिच्या लहान मुलाला म्हणजे त्याच्या लहान भाच्यासाठी ५००० रुपयाची छोटी सायकल विकत घेतली… आजूबाजूच्या सर्वच लहान मुलांनी सायकल घेतल्यामुळे त्यालाही घ्यावी लागली. हल्लीची लहान मुलेही आत्मकेंद्रित झालेली आहेत. त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याकडे जे जे आहे ते ते हवे असते. पालकांचाही नाईलाज असतो कारण आजच्या मुलांना वाटून खाणं हा प्रकारच माहीत नाही. पुढे जाऊन हे प्रकरण पालकांना खूपच महागात पडणार आहे. विजयला आठवले की तो लहान असताना त्याला एका संस्थेने एक सायकल भेट दिली होती.
चाटा क्लास !!
Category:
साहित्य - ललितदैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट सूर्याजीराव रविसांडे, काका सरधोपटांची वाट पहात होते. सूर्याजीरावांचे मूळनाव ताकसांडे. ताकसांड्यांचे रविसांडे कसे झाले ह्याबद्दल, ताकसांडे ते रविसांडे या ताकसांडे घराण्याच्या इतिहास ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ पहावा. (प्रकाशक रोजची पहाट प्रेस) तर सांगायचा मुद्दा आजच्या कथेचा आणि या इतिहासाचा काही संबंध नाही. परंतु वाचक जिज्ञासू असतात असे म्हणतात, म्हणून उल्लेख केला एवढेच. (टीप. या ग्रंथाच्या फारच थोड्या प्रती उपलब्ध आहेत त्यामुळे जिज्ञासूंनी आपली मागणी विनाविलंब नोंदवावी). आता मूळ कथेकडे वळूया.