No Picture
साहित्य - ललित

साक्षात् भीम नाटीका क्र. १ (आठवणींची मिसळ २१)

Category:

 

असं म्हणतात की प्रत्येक मराठी माणसाला नाटकाची ओढ असतेच. एकदा तरी नाटकांत काम करावं ही सुप्त इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. खरं सांगा, तुम्हालाही कधी ना कधी असं वाटलं होतं की नाही? खरं म्हणजे नाटकवेडेपणा हा कांही फक्त गडक-यांवर (राम गणेश) प्रेम करणा-या मराठी माणसाचा किंवा शेक्सपियरवर प्रेम करणा-या इंग्रज माणसाचाच वारसा नाही. तो सर्व मानवजातीचा वारसा आहे. जगांतली कुठलीही भाषा बोलणा-याला आणि कोणतेही तत्त्वज्ञान मानणा-याला कोणत्या ना कोणत्या नाट्यप्रकारांत गोडी असतेच.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ५६)

Category:

 

विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ५५)

Category:

 

सहा महिन्यांनंतर बरेच प्रयोग, औषधे आणि व्यायामाचे प्रकार सातत्याने केल्यावर आता कोठे विजयचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणजे तो आता पायऱ्या सहज उतरू लागला होता. पायाच्या निमित्ताने विजयला सहा महिने सक्तीचा आराम करावा लागला होता तरीही या सहा महिन्यात त्याने त्याचा आर्थिक भार दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर पडू दिला नव्हता. त्याचा खर्च निघावा इतके छोटे मोठे काम तो करतच होता पण याकाळात त्याला घराला आर्थिक हातभार लावता आला नाही त्यामुळे त्याचे बाबा थोडे थोड वैतागल्यासारखे वागू लागले होते कारण आता कुटुंबाचा सर्व आर्थिक भार त्यांच्यावर येऊन पडला होता.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग ६ (आठवणींची मिसळ २०)

Category:

 

मी १९५९-६१ दोन वर्षे युनिव्हर्सिटीच्या फोर्टमधल्या जुन्या इमारतीत एम.ए. च्या लेक्चर्सना जात असे.एम.ए. इकॉनॉमीक्सचे वर्ग फक्त तिथेच असत.त्या काळी डॉ. दातवाला, डॉ.हजारी, डॉ. मिस रणदिवे, डॉ.लकडावाला, डॉ.ब्रह्मानंद, डॉ.शहा, प्रोफेसर गायतोंडे, प्रोफेसर गंगाधर गाडगीळ, प्रोफेसर लाड अशी त्याकाळची नामांकित मंडळी अर्थशास्त्र विभागांत होती.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ५४)

Category:

 

विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..