No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४२ )

Category:

 

एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने नसतात ही गोष्ट लक्षात येते…

No Picture
साहित्य - ललित

रेल्वे पोलिस आणि मी – भाग २ (आठवणींची मिसळ – भाग १०)

Category:

 

आता मी जे दोन प्रसंग सांगणार आहे ते कदाचित पूर्वी कुठेतरी मी थोडक्यात लिहिलेही असतील.त्यातला पहिला प्रसंग माझ्यासाठी इतका गंभीरनव्हता पण मजेदार होता. तर दुसरा फारच गंभीर प्रसंग होता आणि त्याची परिणती वेगळी झाली असती तर मला ते प्रकरण महाग पडलं असतं.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४१ )

Category:

 

विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची पत्नी असेल पंचेचाळीसची वगैरे, त्यामुळे त्या इतक्या कमी वयात वारल्याचे ऐकून विजयला धक्काच बसला ! विजय काही त्यांना कधी प्रत्यक्षात भेटला नव्हता त्यामुळे त्यांच्या एकूणच तब्बेतीबद्दल विजयला काही माहिती नव्हती. पण ! यापूर्वी विजयाच्या त्या मित्राच्या बोलण्यात कधी त्यांच्या तब्बेतीचा विषय निघाला नव्हता म्हणजे त्या फार पूर्वी पासून आजारी वगैरे असण्याची शक्यता कमीच होती.. त्यामुळे विजयने थोडं गंभीर होतच त्यांना प्रश्न केला,” कशा वारल्या ? काय झालं होत ?? त्यावर ते मित्रही गंभीर होत म्हणाले,

No Picture
साहित्य - ललित

रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)

Category:

 

तुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला.

No Picture
साहित्य - ललित

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

Category:

 

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ४०)

Category:

 

सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ?

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ३९)

Category:

 

दोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे नव्हे तर दिसण्याचेही विजयचे एक तंत्र आहे..