किल्ली
Category:
साहित्य - ललितमी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
Category:
साहित्य - ललितमी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
Category:
कथा साहित्य - ललितसकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच असल्याने त्याने २ दिवस चक्कर मारली होती. पूर्वी गावात दिवस कार्य असले की तेराव्या दिवशी गाव जेवायचे, पण आता तसे राहिले नव्हते, परिस्थिती बदलली होती. वरची पाखाडी, खालची पाखाडी आता विभागली गेली होती आणि त्यात सुद्धा गावात शिल्लक अशी किती लोकं होती. अर्ध्याहून जास्त शहरात शिकायला, नोकरीला स्थायिक, काही म्हातारी माणसं आणि जी काही तरुण शिल्लक होती त्यातली अर्धी पर्यटनाच्या नादाला लागून दारूच्या नशेत गाडली गेली होती. त्यामुळे आईच्या दिवस कार्याला काही गाव जेवणार नाही हे रवींद्र ला ठाऊक होते.
Category:
साहित्य - ललितत्यांच्याकडे गेलं की, कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यावर ते स्वतःच्या हाताने काॅफी करुन द्यायचे. कथाचित्र कसे हवे आहे ते स्वतः पोझेस घेऊन दाखवायचे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. वेळ सांगून यायला जमणार नसेल तर फोन करुन तसे सांगण्याची, त्यांनी मला ताकीद दिली होती.
Category:
कथा साहित्य - ललितअंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना त्याच्या हातात टॉर्च किंवा काही दिवा नव्हता, ना त्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात काही होते, केवळ चंद्राच्या प्रकाशात दिसेल एवढ्याच प्रकाशात ती व्यक्ती चालत होती पण, पायाखालची वाट, ती जागा, त्या व्यक्तीला अगदी तोंडपाठ असल्यासारखी वाटत होती. उलट रवींद्रचे लक्ष त्याच व्यक्ती कडे असल्याने तोच मधे मधे अडखळत होता, त्या व्यक्तीच्या हातात काहीसं असल्यासारखं त्याला दिसलं होत.
Category:
साहित्य - ललितरात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला.
Category:
साहित्य - ललितदिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली.
Category:
कथा साहित्य - ललितरवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं.
Category:
साहित्य - ललितमराठीमध्ये एम.ए. केलेल्या मीराताई अतिशय हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. वर्षातून एकदा येणाऱ्या हरतालिकेच्या मूर्तीसारखाच प्रसन्न चेहरा, गोरा रंग, कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, काठपदराच्या साडीमध्ये त्या सदैव हसतमुख दिसायच्या.
Category:
कथा साहित्य - ललितदुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.
Category:
साहित्य - ललितआपण ताज्या पदार्थांच्या समृद्धीपासून पॅकेज पदार्थांच्या गरीबीकडे वेगाने जात आहोत.. हे कुठेतरी थांबायला पाहिजे.. आपली भारतीय खाद्य संस्कृती विसरुन चालणार नाही.. अन्यथा पुढची पिढी ही अंधानुकरणामुळे सुदृढ रहाणार नाही..
Copyright © 2025 | Marathisrushti