एक थेंब, तहानलेला !
Category:
साहित्य - ललितलेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.
Category:
साहित्य - ललितलेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.
Category:
कथा साहित्य - ललितनदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या चढूनच मंदिरात जायचे ठरवले. थोड्याच वेळात ते मंदिरात पोहोचले. मंदिराच्या गाभाऱ्यात सुबक अशी आंबामातेची मूर्ती होती. मंदिरातील वातावरण आणि देवीची मूर्ती पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.
Category:
साहित्य - ललितपुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले .
Category:
कथा साहित्य - ललिततिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले.
Category:
कथा साहित्य - ललितठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले.
Category:
कथा साहित्य - ललित१० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.
Category:
कथा साहित्य - ललितनील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”
Category:
साहित्य - ललितस्थळ : ठाणे ते पुणे एक्सप्रेस हायवे , पुणे ते रत्नागिरी व्हाया कोकरूड , थोडक्यात मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि दरवर्षीची अपरिहार्य असणारी ट्रॅफिकमधील घुसमट टाळण्यासाठी ठाणे पुणे रत्नागिरी असा मार्ग धरलेला . एका अर्थानं ट्रॅफिक जॅमला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्लॅन . मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून माझ्यामते दूरदृष्टीने घेतलेली काळजी.
Category:
कथा साहित्य - ललितआरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते.
Category:
कथा साहित्य - ललिततिघंही कॉफी पीत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. नीलशी बोलताना दी खूपच आनंदी दिसत होती…… नील जरी आरूचा मित्र होता तरी तो घरी आल्यापासून दीबरोबरच जास्त गप्पा मारत होता. आरू एकदा दीकडे आणि एकदा नीलकडे समाधानाने पाहात बसली होती. आज तीला तिच्या दीचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता.
Copyright © 2025 | Marathisrushti