गिनी-बिसाउ
Category:
शहरे आणि गावेऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.