भेट तुझी माझी
Category:
साहित्य - ललितआज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे . आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे . त्या काळी प्रेम करणं महापातक . घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा ‘सुखी ‘ संसार थाटायचा नव्हता . तिनें तिच्या घरच्याना राजी केले . मीच कमी पडलो ! आम्ही शेवटचं भेटलो तेव्हा ‘जमेलसे वाटत नाही ‘ असे सांगितले तेव्हा जाम अपसेट होऊन डोळे पुसत निघून गेली . माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती . मी काय करायचे ठरवले हे तिला सांगणार होतो ! त्यांनतर दिसली नाही ! ती आज भेटतेय ! तीस वर्षांनी !