सातारा जिल्ह्यातील लोकजीवन
Category:
शहरे आणि गावेकर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.