No Picture
शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्हा

Category:

 

कोळसा व चुन्याच्या खाणींसाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आश्रय व ज्यांचे अनमोल कार्य ज्या जिल्ह्याला लाभले तो हा चंद्रपूर जिल्हा.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय:

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्यात मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत. राजुरा व गोंडपिंपरी, मूल व चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Category:

 

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.