No Picture
शहरे आणि गावे

परभणी जिल्हा

Category:

 

परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नाशिक जिल्हा

Category:

 

धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्‍या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्हा

Category:

 

नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

डॉ.हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केली. यांचे बालपण नागपुरातच गेले व यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यांना रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक म्हटले जाते.त्यांनी अविवाहित राहून राष्ट्रकार्य करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी रा. स्व. संघाच्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण केला. त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र नागपूरच होते.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे वर्‍हाडी. मराठीची वर्‍हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषा व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात येतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

हजिरा-धुळे-कोलकता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि हैद्राबाद-दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ हे दोन राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. तसेच मुंबई-कोलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे दोन महत्त्वाचे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात.

No Picture
शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडेल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे,हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे.