Please Login to view Prime Content.
वर्षा ऋतुचर्या

(Gold)
अंगाची लाही लाही करणाऱ्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात सर्वजण पावसाळयाची आतुरतेने वाट पाहत असतात. आगमनाविषयी अनिश्चितता असली तरी जूनच्या सुरुवातीला आपल्याकडे धडकणारा पाऊस येताना आल्हाद, गारवा घेऊन येतो. मात्र हा गारवा, ओलावा येताना अनेक आजारही घेऊन येतो. जरा एक दोन सरी पडल्या नाही की लगेच जवळच्या पर्यटन स्थळी जाऊन भिजायचं, भजी, वडापाव सारख्या पदार्थावर ताव मारायचा, असा जणू काय सध्या ट्रेंड झालेला दिसतो.