राजा परांजपे अभिवादन – रमेश देव, सीमा आणि एक धागा सुखाचा भाग २

सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.

सीमाताई आणि रमेशजी या दोघांचे गुरू स्व. राजा परांजपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेल्या माझ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. त्या स्मृतींना उजाळा देतच त्यांना श्रध्दांजली अर्पण करूया