Please Login to view Prime Content.
टूर लिडर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १०)

(Gold)
दोन दिवसांत कांही मला नांव पाठ झाली नव्हती. पण कोणी चुकू नये म्हणून सर्वांना कंपनीने दिलेली टोपी सतत डोक्यावर घालायची मी ताकीद दिली होती. माझ्या नशीबाने तिथे कोणी चुकले नाही. आम्ही आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन आलो. उतरल्यावर पुन्हा बसमधून ल्युसेर्नला गेलो. तिथे मोठाले तलाव पाहिले. सर्व कसं ठरल्यासारखं होत होतं. मला जास्त कांही करायला लागत नव्हतं. सर्व सदस्यही युरोपचं काश्मीर पाहिल्याच्या समाधानांत होते.