Please Login to view Prime Content.
To Do – एक कथा

(Gold)
माझी ToDo लिहायची सवय फार पूर्वीपासूनची. मी आणि माझी पत्नी राणी, आमच्यामध्ये बाकी गुण समान नसले तरी हा गुण मात्र अगदीच सारखां. अगदी लहान सहान कामेही आम्ही ToDo मध्ये लिहून ठेवतो. घरी घरची ToDo , आणि ऑफिसमध्ये ऑफिसची ToDo. मोठा हुद्दा, मोठा पगार, जास्त कामे, मोठी ToDo. माझ्या ह्या सवयीचा थोडाफार चांगला/वाईट परीणाम माझ्या ऑफिसमधील सहकार्यांवर सुध्दा झालाचं. आणि तेही ToDo लिहू लागले.
कधी कधी तरं हि ToDo फारचं वाढत जाते. मग कधीतरी शनिवारी किंवा रविवारी काही कामे झालीत कि थोडी कमी होऊन बुधवारी परत येरे माझ्या मागल्या. ज्या दिवशी हि ToDo संपेल त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालीन, म्हणतो ! हो पण पूजेची कामे आलीतच कि ToDo मध्यें.