सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.




Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक | Abhay Oka | Marathisrushti Talks  | Episode 7 |  Nov 13, 2025


अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो. न्यायालयीन भाषा सोपी व्हावी, निकाल सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्यांच्या भाषेत मिळावा, इथपासून ते न्यायदानात अजून काय बदल केले जावेत इथपर्यंत अनेक विषयांवर आपलं ठाम मत मांडत आहेत, Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक.

नक्की पाहा, Like करा, Comment करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअरही करा.


या पॉडकास्टमधील महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्नोत्तरे : 

  • कोर्टमध्ये 80–90% मराठी भाषा वापरली जाते. मराठी भाषा वापरली जावी आणि तिचे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी तुम्ही केलेल्या कार्याची माहिती
  • आपली बोलू भाषा आपण कोर्टमध्ये का वापरू शकत नाही? क्लिष्ट भाषा का वापरावी लागते?
  • लोकांमधील civic sense कमी होत चालले आहे का?
  • ‘आपल्या देशात चालते म्हणून काहीही करा’ ही सध्याच्या काळातील मानसिकता
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर जे होत आहे, त्यावर न्यायाच्या दृष्टीने कोणते ठोस उपाय किंवा योजना करता येऊ शकतात?
  • PIN सारख्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही file होते; यावर काही norms तयार करता येतील का?
  • प्रदूषण नियंत्रणासाठी तुम्ही केलेल्या कामांबद्दल चर्चा
  • उपोषण, आंदोलन, मोर्चे यावर काही उपाययोजना शक्य आहेत का?
  • पोलीस दलाचे बळ अनेक अनावश्यक ठिकाणी वापरले जाते; परंतु जिथे मुख्य पोलिस यंत्रणा गरजेची आहे तिथे दुर्लक्ष होते का?
  • महाराष्ट्रातील तुरुंग प्रणालीसाठी तुम्ही केलेल्या कामांचा आढावा
  • शासनाकडे कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किती दिवस लागतात?
  • निकालपत्र सादर करताना न्यायाधीशांची वैयक्तिक टिप्पणी व मत किती महत्त्वाचे आणि त्याचा merit वर काय परिणाम होतो?
  • न्यायालये आणि कायदे क्षेत्रात महिनाभराची सुट्टी असते; मग मागील प्रलंबित काम कसे पूर्ण करता?
  • Karnataka High Court मध्ये असताना pandemic काळात एक Court चालू होतं—त्यावर काही विरोध झाला का?
  • शासकीय कामकाजाला ठराविक वेळेची मर्यादा असावी का? आणि त्या वेळेत काम पूर्ण व्हायलाच हवे का?
  • उंच buildings बांधताना किती नियम पाळले जातात?
  • Karnataka High Court मध्ये त्या एका कर्मचाऱ्याचे विशेष स्वागत का केले गेले?
  • आजच्या काळात अजून कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते?