श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गिरनार ) | Shree datta sthan mahatmya darshan ( GIRNAR )
गिरीनार क्षेत्र हे भारतातील एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. हे भारतातील गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागातील जूनागड शहरात आहे. गिरीनार डोंगर हे भगवान दत्तात्रेयांचं प्रसिद्ध सिद्ध क्षेत्र आहे. भगवान दत्तात्रेय यांनी टेकडीच्या शिखरावर तपश्चर्या केली. येथे असलेल्या दत्त पादुकांचं दर्शन घेण्यासाठी १०,००० (दहा हजार) पायर्या चढून जावं लागतं. गिरीनर ठिकाण पूर्णपणे वनपरिसराने वेढलेले आहे. या शक्तिशाली क्षेत्रातील प्रत्येक पर्यटक खूप आनंददायी वातावरण अनुभवू शकतो. “जय गिरीनारी” आणि “दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा…” या दोन जपांनी दत्तात्रेय पादुका दर्शनाचा प्रवास हलका होतो असा भक्तांचा स्वानुभव आहे.
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
History : Girinar is one of the most ancient datta kshetras in India. It is situated in Junagadh City of Saurashtra region of Gujarat state in India. Girinar Hill is a famous Sidha kshetra of Lord Dattatreya. Lord Dattatreya performed penance at the top of the hill and one have to climb 10,000 (ten thousand) steps to have Datta paduka darshan. Girinar place is completely surrounded by fully forest area. A very pleasant atmosphere can be experienced by each and every visitor to this powerful kshetra. The journey to Dattatreya Padukas is said to be made light by just two chants “Jai Girinaari” and “Digambara Digambara Sripadavallabha Digambara… ”
- – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे. ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते. ★ सौराष्ट्र दर्शन – गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन. ★ त्रिस्थळी – काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन ★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन ★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात. अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.