राधाधन

(Gold)

मंद सांज आर्त साद वंशीनाद अवचितसा ।
अंतरात राधेच्या भास कसा श्यामलसा ।
नभांतरी घन हसती सूर्य हसे शितलसा ।
थरथरत्या वाटेवर श्वास उरी दाहकसा ।। १ ।।

तमभरल्या बंद गेही जीव तिचा होई पिसा ।
राधाधन जपत उरी तरु देती भरवसा ।
कृष्ण दिसे सूर्य हसे गंध येई हलकासा ।
मनातळी गंध झिरे जीव तिचा पुलकितसा ।। २।।

-- रचना : डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .



Please Login to view Prime Content.