पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत. म्हणूनच लावणी परंपरेविषयी काही भाग युट्युब वर प्रकाशित करत आहे. आजच्या भागात सर्वांगीण अभिनयाला पूर्ण वाव देणारी घोड्याची लावणी आणि संगीत रंगभूमीशी नातं जोडणारी अदाची लावणी पेश करत आहोत. जरूर पहा, इतरांना पाठवा, आणि अशाच आशयघन कलाविष्कारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा……
लावणी नृत्यांगना – माया खुटेगावकर.
मार्गदर्शक – छाया खुटेगावकर, ज्येष्ठ नृत्यांगना शकुंतला नगरकर.
गायन – कीर्ती बने. हार्मोनियम – सुधीर जावळकर,
ढोलकी – कृष्णा मुसळे. सहवादक – सचिन घाग.
संकल्पना/संहिता/निवेदन – नरेंद्र बेडेकर.