पंडित राम नारायण म्हणजेच सारंगी आणि सारंगी म्हणजेच पंडित राम नारायण इतकं अद्वैत या दोघांमध्ये निर्माण झालं होतं. ज्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब यांच्या जाण्याने शहनाई पोरकी झाली, त्याचप्रमाणे पंडित रामनारायण यांच्या जाण्याने आज सारंगी पोरगी झाली आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान प्राप्त केलेल्या पंडित रामनारायणजींना 2015 साली राज्य शासनाचा शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक चित्रफित प्रकाशित करण्यात आली होती. त्यांच्या का नतमस्तक होऊन त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूया.
लेखन: अमरेंद्र धनेश्वर
निवेदन आणि चित्रफित निर्माण : नरेंद्र बेडेकर
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकरिता….