क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.



भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला. पण 1857च्या स्वातंत्र्यसमरानं पुढे 90 वर्ष भारतीय क्रांतीलढ्याला सदैव प्रेरणा आणि बळ दिलं. ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’ या कार्यक्रम मालिकेच्या पहिल्या भागात हाच रोमहर्षक इतिहास पाहूया.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.

मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.