अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले. फक्त एक मुलगा सटकला. फक्त 19 वर्षाचा होता तो. त्याचं नाव चं.सि. तिवारी. पुढे देशवासीयांनी त्याला किताब दिला आझाद – चंद्रशेखर आझाद. आझादांसह रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान आणि भगतसिंग यांची क्रान्तिगाथा पाहूया, या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.