महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली. नानांनी महाराष्ट्रात सुरू केलेला प्रयोग पुढे बंगाल, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेशातही झाला. क्रांतीसिंह नाना पाटील यांचं हे कार्य कर्तृत्व जाणून घेऊया, क्रांतीविरांची अमृतगाथा कार्यक्रमाच्या, या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने
‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.