महात्मा गांधी भारताला लढाया, हिंसाचार,आक्रमण, युद्धांचा फार मोठा इतिहास आहे. पण याच देशात शस्त्राविना स्वातंत्र्ययुद्ध लढलं जाऊ शकतं आणि जिंकताही येतं, हे दाखवून दिलं महात्मा गांधींनी. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अहिंसक क्रांतीचे जनक असलेल्या या राष्ट्रपित्याला वंदन करताना ऊर अभिमानानं भरून येतो. पिस्तुलं आणि बॉम्बऐवजी ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हीच दोन आयुधं वापरून त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकुया या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.