१९१० पर्यंत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीन उग्र रूप धारण केलं होत, मृत्यूचं भय भेदून झुंज घेणार्या वंग युवकांमुळेच सरकारला कलकत्त्यातला बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. सरकारनं राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणायचं ठरविलं. पण राशबिहारी बोस सरकारच्या पाठोपाठ दिल्लीत येऊन दाखल झाले. भारताचे नवे व्हाईसरॉय लॉर्ड आणि लेडी हार्डिंग्ज दिल्लीला येणार होते.शक्तीशाली बॉम्बस्फोट करून राजधानी दिल्लीत व्हाईसरॉयच्या स्वागत यात्रेचं अंत्ययात्रेत रुपांतर करणारे राशबिहारी बोस आणि गदर वीर कर्तार सिंग आणि विष्णू गणेश पिंगळे यांची क्रांतीकहाणी अनुभवूया क्रांतीविरांची अमृतगाथाच्या या भागात.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.