क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७

अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.

सावरकरांचे लंडनचे एक साथीदार व्ही.व्ही.एस. अय्यर यांनी दक्षिण भारतात क्रांतीचं तत्त्वज्ञान रुजवलं. तामिळनाडूत ‘गुप्तदल’ सुरू झालं. त्याच्यातर्फे तिरूनलवेली जिल्ह्याचा कलेक्टर रॉबर्ट अँशची शिकार करण्याचं ठरलं. ही शिकार करणार होता एक तरुण कारकूनांची अय्यर! हा सारा रोमहर्षक भाग पाहूया या भागात.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.