दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
नामदेव व्हटकर हे ढोर समाजात जन्मले. पण स्वकर्तृत्वाने मोठे झाले. खूप शिकले. भाषेवर प्रभुत्व मिळवले. गीत लेखन केले. त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स निघाल्या. आकाशवाणीवर कार्यक्रम केले. शेकडो वगनाट्य लिहून जनप्रबोधन केले. कॅमेरा तंत्रज्ञान शिकून फिल्म डिव्हिजन मध्ये नोकरी केली. तिथे अनेक डॉक्युमेंटरीज केल्या. मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. आणि चक्क नायकाची भूमिकाही केली. हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब यांचा अस्पृश्यता निवारण, सामाजिक समता हा विषय त्यांनी कायम आपल्या लिखाणातून, कलाकृतीतून मांडला. आमदार म्हणून विधानसभेतही वंचितांच्या समस्या हे त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या. नामदेव व्हटकर यांनी डॉ. बाबासाहेबां विषयीचा पहिला लघुपट देखील निर्माण केला. तो अनेक भाषांत प्रसिद्ध झाला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य जगभरात गेले.
बाबासाहेबांचे निष्ठावान अनुयायी असलेल्या नामदेव व्हटकर यांच्या कार्याची माहिती घेऊया, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे या पूर्वी केलेल्या कार्यक्रमातील काही संकलित चित्रीकरणातून….
सादरकर्ते: नरेंद्र बेडेकर
संकल्पना: डॉ. सोनाली कदम