गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.
किशोरीताईंच्या गायकी इतकीच त्यांच्या फटकळपणा, विक्षिप्तपणाचीही चर्चा होत असे. त्या संदर्भात विवेचन असलेला, पुस्तकातल्या परिशिष्टामधल्या ‘लौकिक-अलौकिक’ या लेखाचं प्राध्यापिका मनाली सप्रे यांनी केलेलं हे अभिवाचन.
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
चित्रीकरण आणि निवेदन: नरेंद्र बेडेकर