फादर फ्रान्सिस दिब्रिटो,-चित्रफित

भारतीय संस्कृतीशी समरस झालेले ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्य शासनाने फादरना शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.



भारतीय संस्कृतीशी समरस झालेले ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्य शासनाने फादरना शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. एक तर, संत साहित्यासाठीचा ज्ञानोबा तुकाराम यांच्या नावाचा पुरस्कार एका ख्रिस्ती व्यक्तीला जाहीर झाला आणि तोही हिंदुत्ववादी असा शिक्का असलेल्या सरकारकडून. त्यावेळी काही वारकरी तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधही केला होता, याचे ही आज स्मरण होते.

मात्र फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे कार्य आणि व्यक्तित्व गुण त्या सर्वांच्या पलीकडले होते. याचीच माहिती देणारी छोटी चित्रफित प्रसारित करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करीत आहोत