Please Login to view Prime Content.
एक सफर ऑस्ट्रेलियाची

(Gold)
अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर भेटणार्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम हाच प्रश्न केला – अमेरिका आवडली की ऑस्ट्रेलिया ? प्रश्नाचं उत्तर तसं सोपं नव्हतं. दोन्ही देशांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांची तुलना होऊ शकत नाही. अमेरिका ती अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ती ऑस्ट्रेलिया. आर्थिक सुबत्ता हा समान गुण आपल्या नजरेत लगेचच भरतो. पण अन्य वैशिष्ट्येही लगेचच ध्यानात येतात.