Please Login to view Prime Content.
छोटीसी बात…… नाही ला नाही.

(Gold)
लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणार्या, काहीतरी प्रयोग करु पाहणार्या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही. मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे. तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो. आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील. तो महान दोन अक्षरी शब्द आहे ‘नको किंवा नाही.’ किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या ‘अशा बोलण्यामुळेच’ नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.