महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.
लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…
छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते.
लावणी महामहोत्सवात आता पाहू या मुजरा… तमाशा फडतल्या सगळ्या नृत्यांगना सुरुवातीलाच मुजरा करण्यासाठी जेव्हा एकत्रित मंचावर येत असत, तेव्हाच या तमाशात आपल्याला काय दर्जाचा अनुभव मिळणार आहे, याचा अंदाज अस्सल रसिकाला येत असे… नऊवारीत सर्वांग लपेटून, त्या नृत्यनैपुण्य दाखवत असत…रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीबाही करायची त्यांना गरजच भासत नसे.
क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.
न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.
अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.
पंडित राम नारायण म्हणजेच सारंगी आणि सारंगी म्हणजेच पंडित राम नारायण इतकं अद्वैत या दोघांमध्ये निर्माण झालं होतं. ज्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब यांच्या जाण्याने शहनाई पोरकी झाली, त्याचप्रमाणे पंडित रामनारायण यांच्या जाण्याने आज सारंगी पोरगी झाली आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti