मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांनी ताईंच्या आठवणी, त्यांचे सांगीतिक विचार आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गायकीचे दर्शन दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सादर केले. त्या कार्यक्रमाची युट्युब लिंक आपल्या अवलोकनार्थ शेअर करीत आहोत.. जरूर आस्वाद घ्यावा, ही विनंती.
सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.
मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.
महाराष्ट्राची क्रांतिज्योत बंगालन हाती धरली. राजा राममोहनांपासून बंगालात जनजागृतीचे वारे वाहत होते. त्या वार्याला अचूक दिशा दिली स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदाची विदेशी शिष्या भगिनी निवेदिताच्या प्रेरणेनं बंगालात क्रांतिदलाची सुरूवात झाली. आणि ‘तरुण बंगाल’ बलिदानासाठी सिद्ध झाला, तेव्हा त्याचं नेतृत्व करायला पुढे आले अरविंद घोष. त्यांच्यासह खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी अशा बंगाली क्रांतिकारकांची कहाणी पाहूया या भागात.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.
मराठी रंगभूमीला ‘श्रीमंत’ करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे ‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही ‘युट्यूब’च्या
माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.
अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.
भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीच्या महाभारतात अभिमन्यूच्या शर्थिने लढून शहीद झालेल्या सच्चरित्र व चतुरस्र ’चेतनाशक्तीचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. दि. 27 फेब्रुवारी 1931 या दिवशी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो घनघोर रणसंग्राम केला त्याला तोड नाही.
मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या जाण्याने पारंपरिक संगीत रंगभूमी आणि नव्या विचार-आशयांची संगीत रंगभूमी यांना जोडणारा दुवा निखळला आहे.
2012 साली महाराष्ट्र राज्य शासनाने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. त्यावेळी त्यांच्या गौरवपर सादर झालेल्या चित्रफितीद्वारे त्यांच्या कार्याला वंदन करूया.
Copyright © 2025 | Marathisrushti