(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • अनर्थ

    अर्थेचा लाविती अनर्थ ही अनर्थात अर्थ शोधिती माकड वानर मानवजात ही
    असामान्यता मानिती डरकाळी फोडिता तयाला शेर इ काश्मिर म्हणती
    आणि तमाने लाभ मारिता गर्दभ पदी स्थापिती कशी ही उलटी जनता रिती ।।१।।

    नरेचि केला नारयण जगी दांभिक जन फसती नारायण न वसे जगी या नाते आकाशी
    परंतु जेव्हा येता लग्ना स्वसुता सौदामिनी जातो कोठे विश्वभाव हा जातीतच बुडूनी
    अशी ही उलटी जनता रिती ।।२।।

    प्रत्येकाने आपआपुले कार्य करावे खरे त्यातच देशोद्धारण वसे
    हरेक सांगे सांगे संगी सांगे त्याचा संगी परंतु रचवी कागदपत्रे त्यांची हो ना जंगी
    प्रत्येक जाणतो कर्तव्य पराचे स्वहिताचे अधिकार असा हा लग्नाचा संसार ।।३।।

    मी एक त्यातला असे मी जाणतो सर्व हे ठसे पण अगतिकता ही असे
    मग मीही हसतो मजला संसार जगाचा सजला ।।४।।

    --- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

  • रे पर्वता…

    निळसर रंगाच्या दुलईत लपला
    अजून झोप सरली नाही
    पहाटेने हाक देऊनही
    जाग त्याला आलीच नाही!
    कोंबड्यांचा आरव
    पक्ष्यांचे कूजन
    त्याच्याच कुशीतल्या
    मधमाश्यांचं गुंजन
    उगवतीचा सूर्य माध्यावर आला
    अंगावरच्या कणखर घड्यांनी आळस दिला
    थकलो आहे आता ऊन पाऊस झेलून
    श्रांतावंसं वाटतं आता दिगंताकडे पाहून..

    -- आर्या आशुतोष जोशी

  • इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

    मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

  • प्रेम की कर्तव्य ?

    युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी

    मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।