पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

चेर्थला हे केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते कोचीपासून २२ किलोमीटरवर वसलेले आहे. कोची ते अलप्पुझा राज्य महामार्गावर ते आहे. या शहरात. नगरपालिकेबरोबरच तालुका मुख्यालयही आहे. शहराच्या मध्यभागी असलेले कार्थ्यायनी देवीचे मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. संत विश्वमंगलम स्वामीयार यांनी या देवीची प्रतिष्ठापना केली.
नावाचा रंजक इतिहास
संत विश्वमंगलम स्वामीयार यांना एका डबक्यात केवळ डोके बाहेर असलेली कार्थ्यायनीची चिखलाने माखलेली मूर्ती मिळाली होती. मल्ल्याळीत चेर म्हणजे चिखल व थला म्हणजे डोके. यातूनच देवीला चेर्थला कयानी व शहराला चेर्थला नाव पडले.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.
ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठे रोझ गार्डन पंजाबमधील चंदीगढ शहरात आहे.
चंदीगडच्या सेक्टर १६ मध्ये झाकीर रोझ गार्डन आहे. या गार्डनमुळे गुलाबांचे शहर म्हणून चंदीगडची ओळख आहे.
टनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे.
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.
छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर आहे.
लोह-इस्पात उद्योगासोबतच पितळ आणि तांबा उद्योगातही या शहराची भरारी आहे.
एक नियोजित शहर असून, पर्यावरणासाठी दहावेळ पंतप्रधान चषक या शहराने जिंकले आहे.
प्राचीन काळात कौशल राज्याचा हिस्सा हे शहर होते.
महाराष्ट्रातील पुणे शहरात केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंचन, विद्युत, भूतल परिवहन आणि जल व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना मुंबईत सन १९१६ मध्ये झाली. मात्र, सन १९२५ मध्ये हे केंद्र पुणे येथे हलविण्यात आले.::
नियोस्चवॉतनचा किल्ला जर्मनीतील सर्वात भव्य किल्ला आहे. १९व्या शतकातील कल्पनाशक्तींचे प्रतीक असलेला हा किल्ला फुलनॅट नदीच्या खोर्यात आहे. याच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti