रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
महाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत. ३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात आहेत.
मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
झारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे.
या शहरात गोंडाहिल, रॉक गार्डन, मच्छली घर, मुटा मगर प्रजनन केंद्र आणि बिरसा जैविक उद्यान आदी प्रमुख प्रक्षणीय स्थळे आहेत. येथील मगर प्रजनन केंद्रात ५० पेक्षा जास्त मगर आहेत.

कुडलोर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कुडलोर शहराची कधी स्थापना झाली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. चोल, पल्लव, आदी अनेक राजांची राजवट या शहरावर होती. १७५८ ला ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेली लढाई कुडलोरची लढाई नावाने प्रसिद्ध आहे. २००४ ला येथे त्सुनामीचा तडाखा बसला होता.
सील्व्हर बीच प्रसिद्ध
कुडलोर हे तमिळनाडूतील एक बंदर असलेले शहर असून, येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सातव्या शतकात बांधलेले शहरातील पटलीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध सील्व्हर बीच येथून अवघ्या दोन किलोमीटरवर असून, अनेक लोक येथे येतात.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. या जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासी लोकवस्तीचा असून बराचसा बाग अजूनही मागासलेला आहे. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत.
अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे.
८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे.
याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti