(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • धनराज महल

    मुंबईतील धनराज महल हा पुरातन राजवाडा आहे. हैदराबादचे महाराजा धनराज गीर यांनी सन १९३० मध्ये मुंबईत या सर्वात महागड्या राजवाड्याचे बांधकाम केले. द्वितीय महायुध्दाच्या काळात रक्षा मंत्रालयाने हा राजवाडा ताब्यात घेतला होता. मात्र, लगेचच धनराज महल पुन्हा शाही घराण्यांच्या ताब्यात देण्यात आला.

  • जागतिक बँक

    जागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे.

    आयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे.

    जगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची १९४४ मध्ये स्थापना करण्यात आली.

    जागतिक बँक विकसनशील देशांना पायाभूत संरचनेसाठी कर्जपुरवठा करते.

    ब्रिटनहूड परिषदेमध्ये या बँकेच्या स्थापनेबाबत पहिल्यांदा चर्चा झाली.

    जागतिक बँक स्थापनेमागे ब्रिटन आणि अमेरिका यांचा सर्वांत मोठा सहभाग होता. बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे.

  • नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र

    नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट.

    इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island' असे नामकरण केले.

    १९८८ मध्ये जर्मनीने यांवर ताबा मिळविला. पहिल्या महायुध्दावेळी आरंभी ऑस्ट्रेलिया द्वारे नाऊरू काबीज केले गेले.

    १९१९ मध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडचा नाऊरूवर संयुक्त ताबा होता. १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियन प्रशासनाअंतर्गत संयुक्त राष्ट्रसंघ प्रदेश झाला.

    ३१ जानेवारी १९६८ रोजी नाऊरु स्वतंत्र झाला.

  • पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

    आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.

    पुण्याचे प्रशासक रंगो बापुजी धडफळे यांनी इ.स. १६३० मध्ये शहाजी राजांच्या आज्ञेवरुन कसबा, सोमवार, रविवार आणि शनिवारपेठेची बांधणी केली आहे.

  • उज्जैन येथील यंत्रमहल

    श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.

  • थोर्स वेल

    अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते.

    प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.

  • अल्जेरिया – आफ्रिकेतील सर्वात मोठा देश

    अल्जेरियामध्ये १६ व्या शतकात तुर्कीचे राज्य होते. १८३० मध्ये अल्जेरिया ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. १८४७ ला अल्जेरियावर फ्रान्सचे वर्चस्व होते.

    १९ व्या शतकात येथे नागरी कायद्यासाठी चळवळीस प्रारंभ झाला. १९५४ ते १९६२ या काळात येथे रक्तरंजित युध्द झाले. १९६५ ला कर्नल बौमीडीन यांच्याकडे सत्ता गेली.

     

  • ओडलगुरी

    आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग होते नंतर ओडलगुरी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

  • इंग्लंडमधील विंडसर किल्ला

    विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.

  • ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर – जव्हार

    जव्हार हे छोटेखानी शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणू- नाशिक मार्गावर वसले आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. आता नवीन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारचा समावेश झाला आहे.

    १४ व्या शतकापासून जव्हार राजगादीचे स्थान होते. येथे कोळ्यांचे आणि वारलींचे राज्य होते. थंड हवेचे ठिकाण असल्याने जव्हार हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.