(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

    मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.

  • पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

    पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्‍या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

  • इंग्लंडमधील विंडसर किल्ला

    विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.

  • परभणी – कृषी विद्यापीठाचे शहर

    महाराष्ट्रातील परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाची शहर म्हणूनही हे प्रसिध्द आहे. १८ मे १९७२ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली आहे.

    या शहरात मोठी मोठी औद्योगिक वसाहत असून, यात सूतगिरण्या, जिनिंग व प्रेसिंग कारखाने आहेत. या शहरातील शिवाजी उद्यान प्रसिध्द आहे.

  • टॉवर ऑफ लंडन

    विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे.

    युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.

  • खाणकामगारांचे सेवेल

    चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे.

    सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.

  • एक महत्त्वाचे शहर मलकापूर (जिल्हा बुलढाणा)

    मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

  • पैठण – दक्षिण काशी

    औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती.

    वैशिष्ट्यपूर्ण पैठणी साडी, संत एकनाथांची समाधी यासाठी हे शहर प्रसिध्द आहे. प्राचीन काळापासून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. नाथ षष्ठीला येथे मोठा उत्सव होतो.

  • कोकणचा मेवा – करवंदे

    डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.

  • ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक शहर “डोंबिवली”

    डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर. ठाणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. मात्र डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य असे की हे शहर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आ