सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही मृदा दक्षिण महाराष्ट्रातील कोकण परिसरात, कोल्हापूरचा प. भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात आढळते. ही मृदा फळबागांसाठी उपयुक्त आहे.
लोह, जस्त व अॅल्युमिनीअमचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेचा रंग लाल असतो.
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे.
देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून माहूरला विशेष महत्त्व आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा असते.
चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो.
हा पुल २०११ मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ८.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करुन बांधलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी १०,००० कर्मचारी ४ वर्षे काम करत होते.
मोठे आणि लांब पुल बांधण्यात चीन आघाडीवर आहे. जगातील ३५ लांब पुलांपैकी १७ चीनमध्ये आहेत.
जगातील पहिल्या तीन क्रमांकांचे लांब पूल चीनमध्येच आहेत. दुसर्या क्रमांकावर टियानजिंग ग्रॅंड ब्रिज (११३.७ कि.मी.) तर तिसर्या क्रमांकावर Weinan Weihe Grand (७९.७३ कि.मी.) आहे.
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.
बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.
मंगलोर शहरात कन्नड भाषेबरोबरच कोकणी भाषाही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. येथे ख्रिश्चन धर्मीयांची सख्या मोठी असून यरथील सेंट अलोयसिस चर्च प्रसिध्द आहे मंगलोर शहराच्या पश्चिमरस लोह आणि मँगेनिज खनिजांचे मोठे साठे असून येथील मंगलोरी कौले देशभर प्रसिध्द आहेत.
नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.
आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.
१ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर असून यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणूनही ते ओळखले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराडचेच. महाराष्टाचे कार्ल मार्क्सं म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव मोहिते हेही कराड तालुक्यातीलच.
कराडमध्ये कृष्णा व कोयना या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांचा संगम आहे. याला प्रीतिसंगम असे म्हणतात.
Copyright © 2025 | Marathisrushti