विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला नाही. भक्तांच्या श्रध्देला तडा न जाऊ देता युको बॅंकेने पहिल्यांदाच दरवाजा नसलेली बॅंक उघडली आहे.
शनि देवावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच या गावातील कोणत्याही घराला दरवाजे किंवा कडी-कुलुप नाही. या श्रद्धेमुळे आजच्या काळातही ही परंपरा ग्रामस्थ तंतोतंत पाळतात. या गावाच्या २ किमीच्या परिसरात घरांना, दुकानांना, शाळेला दरवाजे नाहीत.
चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे. १७व्या शतकात मद्रासपट्टणम नावाच्या छोट्याशा वस्तीचा ब्रिटिशांनी विस्तार करुन हे शहर वसविले. देशातील आयटी उद्योगाचेही चेन्नई हे दुसरे मोठे केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti