(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • प्राचीन शहर अचलपूर

    अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.

    जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरुन वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे.

    तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.

  • पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर

    एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत.

    २०११ साली या शहराची लोकसंख्या १७ लाख होती. समुद्रसपाटीपासून ५३० मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे.

  • कराड – यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी

    कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर असून यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणूनही ते ओळखले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराडचेच. महाराष्टाचे कार्ल मार्क्सं म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव मोहिते हेही कराड तालुक्यातीलच.

    कराडमध्ये कृष्णा व कोयना या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांचा संगम आहे. याला प्रीतिसंगम असे म्हणतात.

  • दिल्ली मेट्रो

    दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.

  • कोकणचा मेवा – कोकम

    आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही बाजारात मिळतात. कोकमच्या सारची चवही पर्यटकांना या दिवसात घेता येते. मात्र सोबत पॅकींगमध्ये उपलब्ध असलेले गोड-आंबट कोकम किंवा कोकम सरबतालाच पसंती जास्त असते. नारळ आणि कोकमापासून बनविलेल्या सोलकढीची लज्जतही काही निराळीच असते.

  • अमर जवान ज्योती

    देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.

  • दक्षिणेतील मोठे बंदर मंगलोर

    दक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे.

  • थंड हवेचे शहर महाबळेश्वर

    सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले होते. येथील अनेक सुंदर पॉईंटस् पर्यटकांचे आकर्षण आहेत.

  • कोराडी थर्मल पॉवर स्टेशन

    कोराडी थर्मल पॉवर स्टेशन हा विदर्भातील मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प झाला.

    १९७४मध्ये हा प्रकल्प सुरु झाला.

    या प्रकल्पात सात युनिट असून १०८० मेगावॅट विद्युतनिर्मिती केंद्रे असून, कोराडी प्रकल्पाची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • बापू कुटीचे सेवाग्राम

    वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.

    १९२१ साली या सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली. आश्रम स्थापन करण्यात जमनालाल बजाज, विनोबा भावे यांचा सहभाग होता. गांधीजींनी वास्तव्य केलेल्या झोपडीला बापुकुटी म्हणून ओळखले जाते.