जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू या शहरात मुबारक मंडी पॅलेस आहे.
डोगरा राजांचे शाही निवासस्थान असलेल्या या पॅलेसला १५० वर्षांचा इतिहास आहे. राजस्थानी, मुगल, युरोपियन अशा तीन शैलीत हे महल बांधण्यात आले आहे.
कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.
ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो.
हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे.
या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
या संग्रहालयाविषयी अधिक माहिती वाचा खालील लिंकवर..
http://www.marathisrushti.com/articles/150-years-old-central-museum-at-nagpur/
कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे.
कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले.
१८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्या महायुध्दानंतर फ्रेंच व इंग्रजांचे प्रशासकीय विभाग विभक्त झाले.
१९६० मध्ये फ्रेंच वसाहतीचा भाग, तर १९६१ मध्ये इंग्रज वसाहतीचा भाग स्वतंत्र झाला.
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला जाण्यासठी प्रथम सीलचरला जावे लागते. तेथून पुढे बसने जावे लागते.
फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.
कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत. एरवी बाजारात दिसणाऱ्या जांभळापेक्षा लहान आकारातली ही जांभळे खूप गोड आणि चविष्ट असतात. पानांच्या कोनमध्ये त्यांचे सौंदर्यही लोभस वाटते. जांभळाच्या सरबताची चवही समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्समध्ये घेता येते. मात्र ताज्या जांभळाची चव काही निराळीच...
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे.
इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. श्रीचे मंदिर चारही बाजूने बंदिस्त असून पश्चिमाभिमूख आहे पण गणेश मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती ३ फुट उंच ५ फुट रूंद आकाराची आहे. या मूर्तीला दोन हिऱ्याचे डोळे व माणकाची बेंबी आहे.
पुणेकर मंगल कार्याची अक्षदा प्रथम या गणेशाला देतात.
व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti