बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
मुंबईतील धनराज महल हा पुरातन राजवाडा आहे. हैदराबादचे महाराजा धनराज गीर यांनी सन १९३० मध्ये मुंबईत या सर्वात महागड्या राजवाड्याचे बांधकाम केले.
उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर होय.
उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी पिवळीशार किंवा लालभडक रंगाची काजूबोंड लक्ष वेधतात. त्याच्या खालच्या बाजूस काजू बी असल्याने आकारही आकर्षक असतो. बाजारात ओले काजूगर शेकड्याप्रमाणे मिळतात. त्याची उसळ चविष्ट असते. लांजा-राजापूर परिसरातील विक्रीकेंद्रात ताजे काजू मिळतात. काही ठिकाणी काजूबोंडापासून बनविलेल्या सरबताची चवही चाखता येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.

जम्मू आणि काश्मीर हे खोर्यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे.
हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्या जम्मू आणि काश्मीरचे तीन विभाग आहेत. त्यात जम्मू, काश्मीर खोरे आणि लद्दाख यांचा समावेश आहे.
कोराडी थर्मल पॉवर स्टेशन हा विदर्भातील मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प झाला.
१९७४मध्ये हा प्रकल्प सुरु झाला.
या प्रकल्पात सात युनिट असून १०८० मेगावॅट विद्युतनिर्मिती केंद्रे असून, कोराडी प्रकल्पाची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात.
बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, सिध्दारुढ मठ, रंगीत महाल, हजरत खलिउल्लाहची चौखडी ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
बिदरच्या जवळून वाहणार्या मंजिरा नदीतून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. देशातील सर्वात स्वच्छ २२ शहराच्या यादीत बिदरचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ९ आणि २१८ या शहराजवळून जातात.
अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti