जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे.
१७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.
अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते.
भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव असा उल्लेख आहे. महानुभव पंथाचे सस्थापक चक्रधर प्रभु यांनी खांब तलावाच्या काठी जेवण आणि मुक्काम केल्याच्या नोंदी लिळा चरित्रात आहेत.
दक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे.
इटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
तेलहरा हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या शहरातील हवामान वर्षभर विषम असते. उन्हाळ्यात कडक उन्हासह प्रचंड उष्मा, हिवाळ्यात गोठवणारी थंडी, तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस या शहरात पडतो.
महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.
अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
कर्नाटक राज्यातील दावणगेरे शहरात बनविला जाणारा लोणी डोसा देशभर प्रसिध्द आहे.
दावणगेरे हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर असून भौगोलिकदृष्ट्या हे शहर राज्याच्या केद्रस्थानी येते.
राष्ट्रीय महामार्ग क्र ४ वर वसलेले या शहराचे बंगलोरपासूनच अंतर २६५ किलोमीटर आहे.
१९९७ साली चित्रदुर्ग जिल्ह्याचे विभाजन करुन वेगळा दावणगेरे जिल्हा बनविण्यात आला इथले दावणगेरे विद्यापीठ दावणगेरे शहराच्या नावाचा उच्चार बर्याचदा दावणगिरी असा चुकीचा केला जातो.
हे शहर कर्नाटकाचे मँचेस्टर म्हणूनही ओळखले जाते. इथे घरोघर यंत्रमाग व हातमाग पाहायला मिळतात.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे.
एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून या विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti