बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे.
ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे. हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते.
सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री पंडित यांच्या पुर्वजांना दृष्टांत झाला की 'मी मांदार झाडाखाली असून मला वर काढा. ' त्याप्रमाणे मांदार वृक्षाखालील जागा उकरली असता ही गणेश मूर्ती सापडली.ती मूर्ती उजव्या सोंडेची स्वयंभू आहे.
येथील गणपतीला वाड्या भरतात. त्या बघण्यासारख्या असतात.
अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे.
८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे.
याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
अनेक अद्ययावत पुस्तक विक्री दालनांनी डोंबिवली समृद्ध आहे. हजारो डोंबिवलीकर या पुस्तक विक्री दालने आणि वाचनालयांचा लाभ घेत आहेत.
डोंबिवलीतील काही पुस्तक विक्री केंद्रे
मॅजेस्टिक बुक स्टॉल
ज्ञानदा ग्रंथ वितरण
शारदा ग्रंथ वितरण
ललित ग्रंथ सागर
बुक कॉर्नर
गणेश बुक डेपो
बागडे स्टोअर्स
गद्रे बंधू
रसिक बुक डेपो
डोंबिवलीतील काही वाचनालये
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पूर्व
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पश्चिम
श्री गणेश मंदिर संस्थान वाचनालय
ब्राह्मण सभा वाचनालय
बुक कॉर्नर
श्री स्वामी समर्थ ग्रंथालय व संदर्भ ग्रंथालय
रसिक वाचनालय
सावरकर बालवाचनालय
अमृता वाचनालय
रीडर्स कॉर्नर
योगायोग वाचनालय
संपूर्ण वर्षभर विविध संस्थांकडून डोंबिवलीत ग्रंथ प्रदर्शने भरवली जातात. त्यांनाही डोंबिवलीकर रसिक चांगला प्रतिसाद देतात. आतापर्यंत अनेक नामवंत संस्थांनी अशी प्रदर्शने डोंबिवलीत भरवली आहेत. त्यापैकी काही संस्था खालीलप्रमाणे आहेत.
ज्ञानदा ग्रंथ वितरण
आरती प्रकाशन
अक्षरधारा
बुक कॉर्नर
ग्रंथाली
मॅजेस्टिक प्रकाशन
नॅशनल बुक ट्रस्ट
चिल्ड्रन बुक ट्रस्ट
विकास वाचनालय (आता बंद)
डोंबिवली - एक साहित्य नगरी
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.
डिसेंबर १९२१ मध्ये डोंबिवली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. कै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली.
कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
सध्या पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मूर्ती प्रसन्न असून लवकर भक्तांना पावणारी आहे. हे एक जागृत गणेशस्थान आहे.
प्रशस्त अशा जीर्णोद्धार केलेल्या मंदिरातील शेंदूरचर्चित मांडी घातलेली श्री गणेशाची मूर्ती पहाताक्षणी प्रेमात पडावी अशीच आहे. हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी मदत केली असून या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास आहे, हे मंदिर फिरल्यानंतर काही क्षणातच लक्षात येते. प्राचीन काळातील जुनी बांधणी असलेल्या या मंदिराचा गाभारा जास्त मोठा नाही. पण गाभाऱ्यामधील गणेशाची मूर्ती मात्र बऱ्यापैकी मोठी असल्याने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकाम करताना एका वीर पुरुषाच्या स्मारकाचे आणि सतीच्या स्मारकाचे अवशेष सापडले आहेत. या सर्व भग्न मूर्ती आजही मंदिराच्या आवारामध्ये पाहायला मिळतात.
कण्वमुनी भारताची यात्रा करताना या गावामध्ये आले. ते श्री गणेशाचे उपासक असल्याने उपासनेत खंड पडू नये यासाठी बाल दिगंबर गणेशमूर्तीची स्थापना केली.
अतिप्राचीन मंदिर असल्याने या बाल दिगंबर गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बाराही महिने लांबून भक्त येत असतात. या बाल गणेशाचे दर्शन घेऊनच मग अनेक भक्त पुढे भीमाशंकरच्या दर्शनाला जातात.
अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला नाही. भक्तांच्या श्रध्देला तडा न जाऊ देता युको बॅंकेने पहिल्यांदाच दरवाजा नसलेली बॅंक उघडली आहे.
शनि देवावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच या गावातील कोणत्याही घराला दरवाजे किंवा कडी-कुलुप नाही. या श्रद्धेमुळे आजच्या काळातही ही परंपरा ग्रामस्थ तंतोतंत पाळतात. या गावाच्या २ किमीच्या परिसरात घरांना, दुकानांना, शाळेला दरवाजे नाहीत.
Copyright © 2025 | Marathisrushti