(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

    कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन समाजाची काशी म्हणूनही देशभर ओळखले जाते.

    पर्यटकांचे आवडते शहर

    कोप्पळ हे कर्नाटकातील एक पर्यटकप्रिय शहर आहे. येथील किल्ला गवीमठ आणि मालेमलप्पा मंदिर प्रेक्षणीय आहे. येथून जवळच असलेल्या इटगी येथील चालुक्यकालीन पुरातन महादेव मंदिरही सुंदर आहे.

    क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकर हे या परिसरात काही काळ भूमिगत होते.

  • एलिफंटा केव्हज

    मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो.

  • पिंजौर रॉक गार्डन, चंदीगढ

    शहरी आणि औद्योगीक कचर्‍यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.

  • गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

    गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे.

    एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

    या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून या विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न आहेत.

  • ड्युब्रॉनिक

    अॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात.

  • अमर जवान ज्योती

    देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.

  • थोर्स वेल

    अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते.

    प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.

  • अचाट आणि अफाट ‘सिंगापूर ‘

    सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती.

    १५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरण झाले.

  • एक महत्त्वाचे शहर मलकापूर (जिल्हा बुलढाणा)

    मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

  • क्युनका

    स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे.

    १२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.